photo 
छत्रपती संभाजीनगर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्यावा : पण का?

अनिल जमधडे


औरंगाबाद : दिल्लीतील हिंसाचार पोलीसांच्या साक्षीने झालेला आहे. त्याची थेट जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर येते, या अपयशाची जबाबदारी स्विकारून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून दुर करावे अशी मागणी रविवारी (दि.१) पत्रकार परिषदेत केली. 

परवानगी नाकारली

सीएएला विरोध करण्यासाठी, हिंसाचारा निषेध व शांतता राखण्याचे आवाहन करण्यासाठी हम भारत के लोग अभियानअंतर्गत दिल्ली येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ व शांततेचे आवाहन करण्यासाठी २९ फेब्रुवारी रोजी भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागण्यात आली होती. आपल्या निदर्शनामुळे शहराची शांतता भंग होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी गोपनीय माहिती असल्याचे कारण देत सिटी चौक पोलीसांनी परवानगी नाकारली. तसेच त्या पत्रात तुम्हांला समज देण्यात येत आहे, असे शब्दप्रयोग करण्यात आले आहे. 

पोलिसांनी अपमान केला

परवानगी नाकारण्याचे कारण नमूद आहे, ते आमचा अपमान करणारे आहे. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही लोकशाही मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करत आलो आहोत. परवानगी नाकारण्याबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेलो असता, दोन तास ताटकळत बसावे लागले. अखेर सोमवारी भेटू, असा निरोप देण्यात आला. आयुक्तांच्या या वागणुकीचाही निषेध करण्यात आला. दिल्ली हिंसाचारात मरण पावलेल्यांना प्रत्येकी २५ लाख तर जखमींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. समज द्यायला आम्ही गुन्हेगार नाहीत. आमच्यावर क्रिमिनल केसेस दाखल नाहीत. 

पुन्हा पोलीस आयुक्तांना भेटणार 

लोकशाही मार्गाने आंदोलने, निदर्शने करणारे आहोत. सोमवारी (ता. दोन) पुन्हा पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत, त्यांनी परवानगी दिली नाही तर आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करू, असा इशारा ॲड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला. मोदी व शहा यांना देशात अराजकता निर्माण करायची आहे. देशातील गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नेत्यांनी केला. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते अण्णासाहेब खंदारे, मनोहर टाकसाळ, मेराज सिद्दीकी, भगवान भोजने, मुकूल निकाळजे, अश्फाक सलामी यांची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे दादर स्टेशनवर, लोकलने चर्चगेटला जाणार

SCROLL FOR NEXT